Rahul Gandhi: मोदींनी भारतमातेला विकले; राहुल गांधींचा लोकसभेत घणाघात, अमेरिकेपुढे झुकल्याचा आरोप

  विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: नरेंद्र मोदी सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन देशाचे कृषी व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगक्षेत्र , अमेरिकी लोकांसाठी महत्त्वाचा असलेला आमच्या नागरिकांचा संवेदनशील डेटा, आपली सैन्यदले व देशहित आणि भारतमातेलाच विकण्यात आले आहे व असे करताना या सरकारला लाज वाटली पाहिजे’, असा घणाघाती हल्ला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सरकारवर चढविला.


आपण जे आरोप करत आहोत ते आपण संसदेच्या पटलावर सत्यापित करू, असे प्रतिआव्हान देऊन ते म्हणाले की, ‘अमेरिकेच्या न्याय विभागाकडे एपस्टीनशी संबंधित फाइल्स आहेत, ज्यात केंद्रीय मंत्री हरदीप पुरी आणि उद्योगपती अनिल अंबानी यांची नावे आहेत. अदानी यांच्यावरील गुन्ह्याचे प्रकरण अमेरिकेत सुरू असून त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. याबाबतही सरकारने १८ महिन्यांपासून प्रतिसाद दिलेला नाही. पंतप्रधानांवर थेट दबाव आहे’, असे आरोप त्यांनी केले.


Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...