लखनऊ: एका महिलेच्या लेकीचा विवाह ठरला. घरात लगीनघाई सुरु होती. त्याचवेळी ती महिला होणाऱ्या जावयासोबत फरार झाली. आता या कहाणीत नवं वळण आलं आहे. आधी जावयासोबत पळून गेलेली महिला आता तिच्या भावोजींसोबत फरार झाली आहे. या महिलेच्या तक्रारी, तिच्या कुटुंबाचे दावे चर्चेत आहेत.
ही गोष्ट उत्तर प्रदेशच्या अलिगढमधील मडराकमधून सुरु होते. इथे राहणाऱ्या एका कुटुंबात लग्नाची तयारी सुरु होती. तारीख ठरली होती १६ एप्रिल २०२५ घरात दागिने रोख रक्कम होती. नातेवाईकांची वर्दळ वाढली. पण लग्नाच्या १२ दिवस आधी घडलेल्या घटनेनं साऱ्यांनाच धक्का बसला.

Post a Comment