भिगवण हादरले! २१ वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण; संतप्त नागरिकांचा हायवेवर रास्तारोको, आज ‘भिगवण बंद’ची हाक..


भिगवण (प्रतिनिधी):

भिगवण परिसरातून एका २१ वर्षीय तरुणीचे तिच्या आई आणि भावाला बेदम मारहाण करून तसेच डोळ्यात मिरचीची पुड टाकत काल दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 04.00 वाजता अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले असून, आरोपींना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज आणि स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने अपहरण केले. यावेळी तरुणीला वाचवण्यासाठी आलेल्या तिच्या आई आणि भावालाही आरोपींनी मारहाण केली. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच नागरिक आक्रमक झाल्याचे यावेळी पहायला मिळाले..

पुणे-सोलापूर हायवेवर आंदोलनाचा भडका

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक आणि सकल हिंदू समाजाच्यावतीने भिगवण पोलीस स्टेशनसमोर ठिया मांडला. संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्गावर उतरून टायर जाळून रास्ता रोको केला. यामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. "जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही आणि तरुणीचा शोध लागत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही," अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. पोलिसांनी समजावल्यानंतर व आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

आज ‘भिगवण बंद’चे आवाहन

या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सकल हिंदू समाजाकडून आज **'भिगवण बंद'**ची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून, सकल हिंदू समाजाच्यावतीने आज भिगवण मध्ये मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे .

पोलिस तपासाची सद्यस्थिती

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

 * CCTV फुटेज: परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून, त्याद्वारे आरोपींचा मार्ग शोधण्याचे काम सुरू आहे.

 * अटकेचे आश्वासन: पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करताना पुढील २४ तासांच्या आत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत...



Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...