अकोले- प्रतिनिधी.
येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त अंकलेश्वर मंदिर देवस्थानच्या परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सप्ताहामध्ये पहाटे काकड भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, प्रवचन ,किर्तन इत्यादी दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहाला आजपासून सोमवार (दि. ९) पासून कलश पूजन आणि ग्रंथ पूजनाने प्रारंभ होणार असून सलग सात दिवस रात्री नऊ ते अकरा वाजता कीर्तन सेवेचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. हरिनाम सप्ताहाच्या सुरुवातीला सोमवारी अर्जुन महाराज लाड, मंगळवारी युवराज महाराज देशमुख, बुधवारी गुलाब महाराज भराटे, गुरुवारी श्रवण महाराज जगताप, शुक्रवारी भरत महाराज योगी, शनिवारी दयानंद महाराज कोरेगावकर रविवारी पांडुरंग महाराज गिरी, यानंतर सोमवारी विनोद कृष्ण शास्त्रीजी यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. या सोहळ्याच्या सौजन्यासाठी मृदुनंगाचार्य, गायनाचार्य यांची साथ लाभणार आहे. तसेच यावर्षी पालखी सोहळा, दीपोत्सव, असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत .अशी माहिती आयोजकांनी दिली.अकोले गावातील ग्रामदैवत अंकलेश्वर मंदिर भव्य असून महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.यामुळे या दिवशी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.यामुळे अंकलेश्वर देवाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.
फोटो ओळ--अकोले गावाचे ग्रामदैवत अंकलेश्वर मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

Post a Comment