⚡ ब्रेकिंग News

भिगवण ग्रामीण रुग्णालयात रोटरी क्लबच्या वतीने 'डॉक्टर्स डे' उत्साहात साजरा; वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान..

भिगवण ग्रामीण रुग्णालयात रोटरी क्लबच्या वतीने 'डॉक्टर्स डे' उत्साहात साजरा; वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान

**भिगवण:**


समाजातील प्रत्येक घटकाचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांचे योगदान अमूल्य आहे. याच कृतज्ञता भावनेतून रोटरी क्लबच्या वतीने येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये १ जुलै रोजी 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विभूते व त्यांच्या संपूर्ण टीमचा विशेष सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

रुग्णसेवा हेच डॉक्टरांचे ध्येय: प्रवीण वाघ

कोरोना काळापासून ते आजतागायत ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना तत्पर आणि दर्जेदार सेवा देणाऱ्या भिगवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, सर्व डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवक-सेविकांचा रोटरी क्लबच्या वतीने पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण वाघ म्हणाले की, "डॉक्टर हे समाजाचे खऱ्या अर्थाने रक्षक आहेत. स्वतःच्या सुखाची, कुटुंबाची आणि वेळेची पर्वा न करता रुग्णांचे प्राण वाचवणे हेच त्यांचे मुख्य ध्येय असते. ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये अनेक मर्यादा असूनही येथील डॉक्टर आणि कर्मचारी देत असलेली सेवा अत्यंत कौतुकास्पद आहे."

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर-

या कृतज्ञता सोहळ्याला रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रविण वाघ, सचिव डॉ. प्रशांत चवरे, खजिनदार संजय चौधरी, माजी अध्यक्ष रियाज शेख, संतोष सवाने, औदुंबर हुलगे यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. विभूते, नितीन परकाळे, रुग्णालयातील परिचारिका, औषध निर्माता आणि इतर सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...