⚡ ब्रेकिंग News

अकोले येथे कृषी विभागाच्या वतीने एल निनो बदलत्या हवामानाचा शेतीवर परिणाम याविषयी चर्चासत्र..

 

अकोले येथे कृषी विभागाच्या वतीने एल निनो बदलत्या हवामानाचा शेतीवर परिणाम याविषयी चर्चासत्र


अकोले- (ता.इंदापूर) येथे  हवामान अंदाज व एल निनो बदलत्या हवामानाचा शेतीवर काय परिणाम होऊ शकतो त्या अनुषंगाने कृषी विभाग व राष्ट्रीय अजैविक तण व्यवस्थापन संस्था बारामती आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 

यामध्ये शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी तसेच माती परीक्षण व गट शेती जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षण करण्याचे महत्त्व सांगून गट स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.तसेच सेंद्रिय व जैविक शेतीवर भर देऊन रासायनिक खताचा खर्च कमी करण्यासाठी हिरवळीचे खते निंबोळी अर्क दशपर्णी ,अर्क जीवामृत आणि घन जीवामृत यांसारख्या घरगुती  जैविक निविष्टाचा वापर वाढवावा. व पेरणीपूर्वी पूर्वतयारी खरीप पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे बियाणे उगवण क्षमता तपासणे आणि रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा.सरकारी योजनासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज कसा करावा तसेच एसटी, एससी प्रवर्गातील शेतकऱ्यांचे अर्ज वाढवून त्यांना शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळवून देता येईल याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा झाली.तंत्रज्ञानाचा वापर महाविस्तार हे एआय ॲप आधुनिक शेतीकडे पाऊल टाकत आहे.यामुळे मोबाईलवर शेतकरी नोंदणी कशी करावी हे प्रात्यक्षिक यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपकृषी अधिकारी  खंडागळे सर , सरडे साहेब व सहाय्यक कृषी अधिकारी अर्जुन धोत्रे यांनी मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञानदेव दराडे, बाबासो दराडे, संतोष गायकवाड, दत्तात्रय दराडे, नारायण दराडे, संदीप सुबनावळ,राम दराडे,जयदीप दराडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...