अकोले - प्रतिनिधी:
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या पूर्वतयारी बाबत प्रकाश सापळा व बीजप्रक्रियेचे कृषी प्रशिक्षण शिबीर म्हसोबावाडी (ता.इंदापूर) येथे पार पडले.हे कृषी प्रशिक्षण शिवाजी काळे यांच्या शेतावर आयोजित करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन मोरे यांनी हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'प्रकाश सापळा' कसा तयार करावा आणि त्याचा वापर कसा करावा, याचे थेट प्रात्यक्षिक दाखवले. त्याचप्रमाणे, पिकांची उगवण क्षमता वाढवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी 'बीजप्रक्रिया' कशी करावी, याचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता कशी तपासावी, याबद्दलही त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली.यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री गरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कृषी अधिकारी सचिन मोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी दत्तात्रय ढमाळ, भाऊ जाधव यांच्यासह इतरही प्रगतशील शेतकऱ्यांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला.याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment