⚡ ब्रेकिंग News

थरारक! भिगवण मधुन भरदिवसा २१ वर्षीय तरुणीचे अपहरण;

 भिगवण :- 17/02/2026

शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज 04  वाजण्याच्या सुमारास भिगवण विश्रामगृह येथील रस्त्यावरून एका २१ वर्षीय तरुणीचे चारचाकी गाडीतून आलेल्या 2 व्यक्तींनी भरदिवसा अपहरण केले. आरोपी दोन्ही सख्खे भाऊ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या आई सोबत भावाच्या गाडीवरून भिगवण विश्रामगृह परिसरातून जात असताना, आरोपींनी गाडी आडवी लावत तिला अडवले. काही सेकंदातच दोन तरुण खाली उतरले आणि डोळ्या मध्ये मिरची पुड टाकली व तरुणीच्या आई व भावाला लाकडी दांडक्याने मारहाण करत तरुणीला गाडी मध्ये घेऊन पसार झाले. या घटनेनंतर आई व भावाने भिगवण पोलिस स्टेशनकडे धाव घेत गुन्हा दाखल केला.

घटनेची माहिती मिळताच बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी वेगाने तपास सुरू केला असून पोलिस परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासात असून, तातडीने नाकाबंदी जाहीर केली असून शहराबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर तपासणी सुरू आहे, तपासासाठी टीम रवाना केले आहेत. तसेच कॉल डिटेल,  लोकेशन तपासणे सुरू आहे लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील." असे आश्वासन त्यांनी दिले.. 

भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी अशी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. स्थानिक संघटनांनी उद्या भिगवण बंद ची हाक दिली आहे..


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...