⚡ ब्रेकिंग News

भिगवणमध्ये श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाचा उत्साह; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल...

भिगवणमध्ये श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाचा उत्साह;  धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल...

समर्थ न्युज नेटवर्क : 

भिगवण येथील भैरवनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


भिगवणचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांचा वार्षिक यात्रा उत्सव २०२६ निमित्त परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवार दि. ९ एप्रिलपासून या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत असून, सलग चार दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक विधी, मनोरंजनाचे कार्यक्रम आणि जंगी कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे.

महाप्रसादाने यात्रेचा शुभारंभ...

उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत गावातील अन्नदात्यांच्या वतीने भव्य 'महाप्रसादाचा' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

धार्मिक विधी आणि शोभेची दारूगोळा...

शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी पहाटे ६ वाजता देवाचा अभिषेक आणि सकाळी ९ वाजता मुखवटे व पोशाख पूजन होईल. सायंकाळी ४ वाजता 'गावकऱ्यांची शेरणी' वाटप केली जाईल. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला पालखी छबिना सोहळा रात्री ८:३० वाजता निघणार आहे. रात्री ११ वाजता भव्य 'शोभेची दारूगोळा' (आतषबाजी) होणार असून रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत भाविकांकडून दंडवत घालण्याचा कार्यक्रम चालेल. या रात्री ज्योत्सना सपकाळ यांचा ऑर्केस्ट्रा भाविकांच्या मनोरंजनासाठी सज्ज असेल.

कुस्त्यांचा जंगी आखाडा...

शनिवारी दि. ११ एप्रिल रोजी सकाळी मान-पान वाटपानंतर ९:३० वाजता आखाडा पूजन होईल. सकाळी १० वाजता 'लावण्य मदन मंजिरी' या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरवण्यात येणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील नामांकित पैलवान सहभागी होणार आहेत.



गौतमी पाटील यांचा विशेष कार्यक्रम...

यात्रेच्या सांगता दिनी म्हणजेच रविवारी दि. १२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम खास महिलांच्या उपस्थितीत पार पडणार असुन, खास महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.. या साठी व्यवस्था देखील करण्यात आली आहे..

'भैरवनाथच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात हा उत्सव साजरा करण्यासाठी समस्त ग्रामस्थ भिगवण यांनी जय्यत तयारी केली असून, भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीतर्फे करण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...